शेतकऱ्यांना मोठा फटका: टोमॅटोच्या दरात घसरण

मुंबई : टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटोचे दर २००० रुपये किलोवरून ८ ते १० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. भावात अचानक घसरण सुरू झाल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

तर दुसरीकडे गवार, लसूण, आद्रक यांचे दर टिकूण आहेत.दरम्यान आगामी काळात नवीन टोमॅटो मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होणार आहेत. नवीन टोमॅटो बाजारात दाखल झाल्यानंतर आवक वाढून टोमॅटोचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. टोमॅटोचे भाव वाढल्यामुळे पुढेही असेच भाव टिकून राहातील अशी अपेक्षा बाळगुन अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड केली.

मात्र आता भाव कोसळल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहीला आहे. तर दुसरीकडे गेल्या एक महिन्यापासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने खरीपाच्या पिकांची वाढ खुंटली आहे.