जरांगे पाटील यांनी वैद्यकीय तपासणीला दिला नकार….

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. गेल्या १४ दिवसांपासून हे आमरण उपोषण सुरू आहे. राज्य सरकारकडून वारंवार त्यांना उपोषण मागे घ्यावं यासाठी आवाहन केलं जात आहे. मात्र जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान, जरांगे पाटील यांनी वैद्यकीय तपासणीलाही नकार दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला चार दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. चार दिवसांत सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर पाणी आणि औषधांचा त्याग करण्याचा इशारा दिला होता. तसंच औषधं घेण्यास नकार दिला असून डॉक्टरांनी लावलेल्या सलाईन काढून टाकल्या आहेत. एवढंच नाही तर वैद्यकीय तपासणीलाही त्यांनी विरोध केला आहे.