चांद्रयान-3 मोहिमेबाबत मोठी माहिती

दिल्ली : चांद्रयान-3 मोहिमेबाबत मोठी माहिती समोर आली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ संशोधन करत असणाऱ्या प्रज्ञान रोव्हरने 100 मीटरहून अधिक अंतर पार केले आहे.चंद्रावरील खड्ड्यांमधून वाट काढत प्रज्ञान रोव्हरचा प्रवास अजूनही सुरू आहे.

प्रज्ञानने आतापर्यंत चंद्रावर कित्येक मिनरल्सच्या अस्तित्वाचा शोध लावला आहे. यामध्ये ऑक्सिजन, सल्फर आणि इतर मूलद्रव्यांचा शोध लावला आहे. यामध्ये अ‍ॅल्युमिनिअम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, मँगनीज आणि सिलिकॉन अशा घटकांचा समावेश आहे.इस्रोने आपल्या पोस्टमध्ये एका फोटोच्या माध्यमातून विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरची जागा दाखवली आहे. विक्रम लँडर ज्याठिकाणी उतरले, त्या शिवशक्ती पॉइंटपासून काही अंतरावर प्रज्ञान रोव्हर दिसत आहे. हा फोटो जेव्हा घेतला, तेव्हा प्रज्ञानने 101.4 मीटर अंतर पार केले होते असंही यात सांगितलं आहे.