गॅस सिलेंडरच्या किंमतीत 200 रुपयांनी घट

दिल्ली : केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 200 रुपयांनी घट केली आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवर 200 रुपयांचं अनुदान जाहीर केलं आहे. हे अनुदान उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 100 रुपयांनी कमी केली होती. पण घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार, एलपीजी सिलेंडरच्या दराचा आज आढावा घेण्यात आला. त्यानंतर आजच दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वसामान्यांना दिलासा देत सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त केला करण्यात आला आहे. पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजीच्या किंमतीचा आढावा घेत असतात. त्यामुळे 1 तारखेपासून नवे दर लागू होतील.

🤙 9921334545