कोल्हापुरातील १० हजार युवकांना अयोध्या श्री राम मंदिराचे दर्शन घडविणार : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांची शिवसेना शिवसेनेचे मुख्यनेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण करत आहे. मुख्यनेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेस राज्यभरातील जनतेतून उदंड प्रतिसाद मिळत असून त्याचा परिपाक महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत आहे. शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांच्या शिवसेनेची संपूर्ण महाराष्ट्र राज्यात भगवी घौडदौड सुरु करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्धार केला असून, त्या अनुषंगाने शिवसेनेची संघटनात्मक बांधणी सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम पाहून शिवसेनेत विविध पक्षातील प्रमुख पदाधिकारी प्रवेश करत आहेत. अयोध्या येथील श्री राम मंदिराच्या उभारणीमध्ये शिवसेनेचा मोलाचा वाटा असून, दि.६ डिसेंबर या हिंदुत्वाच्या शौर्य दिनानिमित्त कोल्हापुरातील १० हजार युवकांना अयोध्येतील श्री राम मंदिराचे मोफत दर्शन घडविणार असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.

यासह आगामी काळात पक्ष बांधणी साठी शिवदूतांची नेमणूक करावी, शाखांची उद्घाटने करावीत, करवीर दक्षिण आणि उत्तर मतदार संघात जेष्ठ पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेण्याच्या सूचना केल्या.शिवसेना पक्ष बांधणीसाठी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आम आदमी पार्टीच्या महिला शहर अध्यक्ष अमरजा पाटील, उपाध्यक्ष संतोष घाटगे, लमाण बंजारा विकास महासंघ,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रामचंद्र शंकर पवार, लमाण बंजारा विकास महासंघ, जिल्हा अध्यक्ष,कोल्हापूर रवी राठोड, जयवंत पलंगे, विशाल वाठारे, अरुण राऊत, धैर्यशील शिंदे, मारुती पोवार, शशिकांत माळीयांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी महिला आघाडी महानगरप्रमुख मंगल साळोखे, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, किशोर घाटगे, शिवाजी पाटील, तुकाराम साळोखे, उदय भोसले, सुनील जाधव, जयवंत हारुगले, बिंदू मोरे आदी उपस्थित होते.