भाजपच्या पदाधिकारी सना खान बेपत्ता प्रकरणात पोलिसांना मोठे यश

नागपूर : येथील भाजपच्या पदाधिकारी सना खान बेपत्ता प्रकरणात तपास करताना पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. पोलिसांनी सना खानचा बिझनेस पार्टनर अमित उर्फ पप्पू साहू याला अखेर बेड्या ठोकल्या आहेत.

आपणच सना खानची हत्या केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.सना खानची हत्या केल्यावर तिचा मृतदेह हिरन नदीत फेकल्याचं आरोपी अमित साहूने पोलिसांना सांगितलं आहे. दरम्यान, अमितने जेथून सनाचा मृतदेह नदीत फेकला तिथे पोलीस त्याला घेऊन गेले. पोलिसांकडून नदीत मृतदेहाचा शोध घेण्यात आला. मात्र, अद्यापही मृतदेह हाती लागला नसल्याची माहिती आहे.

नागपूर येथील भाजपची पदाधिकारी सना खान १ ऑगस्टला जबलपूरला रवाना झाली होती. २ ऑगस्टला तिथे पोहोचल्यानंतर तिने आईला जबलपूरला पोहोचल्याची माहिती दिली. मात्र, त्यानंतर ती बेपत्ता झाली. पुन्हा फोन केल्यावर तिचा फोन बंद होता. सनाच्या आईने तिचा बिझनेस पार्टनर अमित साहूला फोन केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.