कसबा बावड्यात जलतरण तलावाचे भूमिपूजन

कोल्हापूर : कसबा बावडा पॅव्हेलियन मैदान परिसरात सुमारे 3 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या जलतरण तलावाचे भूमिपूजन आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून कसबा बावडा पॅव्हेलियन मैदान परिसरात 3 कोटी रुपये खर्चून स्विमिंग टॅंक उभारण्यात येणार आहे.या तलावाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी जागेची पाहणी करून कामाची माहिती घेतली.

यावेळी माजी महापौर स्वाती येवलुजे, माजी नगरसेविका माधुरी लाड, माजी नगरसेवक मोहन सालपे, अशोक जाधव, सुभाष बुचडे, डॉ संदीप नेजदार ,श्रावण फडतारे,श्री राम सोसायटीचे चेआरामन हिंदुराव ठोंबरे, व्हाईस चेआरमन सविता रणदिवे, शहर अभियंता हर्षजीत घाटगे,अरुणकुमार गवळी, पूर्णेनंद्र गूरव ,कंत्राटदार अजय पाटील, अर्णव पाटील, सागर येवलुजे संजय लाड यांच्यासह कसबा बावडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.