१ एप्रिल पासून इक्विटी कॅश आणि डेरिव्हेटिव्हज व्यवहारांवरील शुल्कात मोठे बदल

मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजाराने इक्विटी कॅश आणि डेरिव्हेटिव्हज व्यवहारांवरील ६ टक्के शुल्कवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ०१ एप्रिल २०२३ पासून इक्विटी कॅश आणि डेरिव्हेटिव्हज व्यवहारांवरील शुल्क पूर्वीप्रमाणे ४ टक्के इतके राहील, असे NSEने म्हटले आहे.

एनएसईने जानेवारी २०२१मध्ये इक्विटी आणि डेरिव्हेटिव्हजमधील ट्रेडिंगचे शुल्क ६ टक्के इतके वाढवले होते. मात्र या ट्रस्टमधील आर्थिक योगदानाचा फेर आढावा घेण्यात आला. यानंतर शुल्कवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यातच राष्ट्रीय निर्देशांक असलेल्या NSE ने नियमात बदल केला असून, यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळेल, असे सांगितले जात आहे.

🤙 8080365706