बालिंगा विद्यामंदिर येथे गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार..व चाळीस विद्यार्थी दत्तक योजना कार्यक्रम..

बालिंगा : बालिंगा, ता. करवीर येथील विद्यामंदिर बालिंगा या शाळेतील पहिली ते पाचवी तसेच स्कॉलरशिप मध्ये तालुका स्तरावर राज्यस्तरावर शैक्षणिक गुणवत्ता मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षिका यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलतांना मुख्याध्यापक आकाराम कांबळे म्हणाले की, अशा कौतुकाने मला व माझ्या स्टाफला हुरूप आला असून नविन जोमात काम करून शाळूचे व गावचे नाव रोशन करीन अशी हमी देतो. तसेच यावेळी मोहन कांबळे यांनी शाळेचा आढावा घेवून शाळेतील गरजू व गरीब विद्यार्थी तसेच वर्गातील प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक मिळणारे चाळीस विध्यार्थांचा शैक्षणिक खर्च आनंदा जाधव व आपली टीम करणार असल्याचे जाहीर करून याचा जास्तीत जास्त मुलांना फायदा होवुन शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागेल असे नमुद केले.

या कार्यक्रमास आनंदा गणपती जाधव, धनंजय ढेंगे, प्रकाश जांभळे, कृष्णात माळी, मोहन कांबळे, अजित कांबळे, संभाजी जांभळे, सचिन बुडके, सरदार जांबळे ,नंदकुमार जांभळे, अमर यादव, सतीश मोहिते ,राजू सय्यद, शशिकांत चौगुले, अजय वाडकर व मुख्याध्यापक आकाराम कांबळे उपस्थित होते.