आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष व्यवसाय व्यापारातील जागेचा प्रश्न मिटेल. व्यवसायातील पत वाढेल. मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याकडून मदत मिळेल. वारसा अधिकार मिळेल. विमामुळे लाभ होतील. घर प्रापर्टी खरेदी अचानक घडेल. दुरचे प्रवास घडणार आहेत.

वृषभ नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना विद्याभासात वाचनात गोडी निर्माण होईल. नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धीची प्रशंसा होईल.

मिथुन नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. मित्र नातेवाईक आप्तेष्टा कडून सहकार्य लाभेल. कुटुंबात मंगलकार्याची रूपरेखा आखली जाईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल.

कर्क प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. नवीन व्यक्तीशी स्नेहपूर्ण संबंध प्रस्थापित होतील. आपल्या अंगी असणाऱ्या कला गुणांना वाव मिळेल. मनातील इच्छित काम मार्गी लागतील. शुभ संदेश मिळतील. घरात आप्तेष्ट नातेवाईकांचे आगमन होईल. आत्मसन्मान वाढेल.

सिंह काही मनस्तापासारख्या घटना घडतील. ताणतणाव जाणवेल. कौटुंबिक बाबीवर खर्च वाढेल. आर्थिक व्यवहार अत्यंत सावधानीपूर्वक करावेत. जामीन राहू नका. बँकेत कर्जप्रकरणाकरीता आजचा दिवस टाळा. नोकरीत महत्वाच्या कामात अडथळे निर्माण होतील.

कन्या धरसोड मनोवृत्ती सोडा. ध्येय निश्चित करा. कामाप्रती विशेष ओढ निर्माण होईल. काही नव-नवीन कल्पना आमलात आणा. क्रिएटिव मंडळीसाठी आजचा दिवस स्पेशल आहे. सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तीकरिता आज शुभ योग आहे.

तूळ नोकरी व्यवसायात प्रगती होण्याचे योग आहेत. काहींना नोकरीत प्रमोशन मिळेल. नव्या योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या व मान्यवर व्यक्तींचा सहवास लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आपल्या कार्याची दखल घेतली जाईल. प्रशंसा व मानसन्मान मिळेल.

वृश्चिक आज दिनमान उत्तम राहील. संकुचित मनोवृति टाळा. आपल्या योजना आज सफल होणार आहेत. सर्वच बाबतीत समाधान लाभेल. मनाप्रमाणे घटना घडतील. आध्यात्मिक देवधर्म यावर श्रद्धा वाढेल. मंगलकार्य धार्मिक कार्य घडतील.

धनु अन्यथा आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या विषयी विरोध मतं निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्‍याला मिळेल असी स्थिती आहे. व्यापारी वर्गाांनी कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत. आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे.

मकर व्यवसायात वाढ होईल मोठ्या गुंतवणुकीसाठी योग्य दिवस आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मित्र किवा सहकारी यांच्याकडून मदत मिळेल. मनामध्ये उर्जा व आत्मविश्वास वाढीस लागेल. वैवाहिक जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील.

कुंभ आज आर्थिक स्थिती फारसी चांगली राहणार नाही. नैराश्यामुळे चिडचिड निर्माण होईल. बुद्धीवर पडदा पडल्यासारखा अनुभव कराल. खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक चिंताही वाढेल. रोजगारात जबाबदारी नुसार काम करा.

मीन दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहिल. नोकरीत कामाच्या ठिकाणी आपली प्रशंसा कौतुक केले जाईल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल.