साकळाई उपसा सिंचन योजनेला मान्यता दिल्याबद्दल सरकारच्या प्रति कृतज्ञता सोहळा संपन्न

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व नगर तालुक्यातील ३५ गावांना वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेला मान्यता दिल्याबद्दल सरकारच्या प्रति कृतज्ञता सोहळा आज पार पडला.

या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठी घोषणा केली.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ”महसूल खात्याच्या माध्यमातून आम्ही काही निर्णय करत आहोत. आज राज्यभर वाळू बंद आहे. वाळूचे लिलाव कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.वाळूची ठेकेदारी आपण बंद केली. आता सरकार वाळू थेट जनतेला विकणार आहे. यामुळे कमी पैशात जनतेला वाळू उपलब्ध होईल. आता सर्व ठिकाणची वाळू सरकार स्वत: काढणार आहे”, असं ते म्हणाले.