आनंदाची बातमी! भारतीय शेअर बाजार पाचव्या स्थानावर

दिल्ली: भारतीय गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय शेअर बाजार जागतिक इक्विटी बाजारांमध्ये पुन्हा पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

अदानी समूहाच्या शेअर्सच्या विक्रीमुळे फ्रान्सने भारताला इक्विटी बाजारात काही काळासाठी मागे टाकलं होतं. पण आता अदानी शेअर्सची बाजारातील परिस्थिती सुधारताना दिसत आहेत. त्यामुळे भारताने फ्रान्सला मागे टाकत पुन्हा एकदा पाचव्या स्थानावर उडी घेतली आहे.भारतीय शेअर बाजार (Indian Share Market) इक्विटी बाजारांमध्ये (Equity Market) पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय बाजार भांडवल मूल्य (India’s Market Capitalization) शुक्रवारी 3.15 ट्रिलियन डॉलर इतके होते. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, बाजाराचे भांडवल मूल्यामध्ये भारत सध्या पाचव्या स्थानावर आहे. त्यानंतर भारताच्या मागे फ्रान्स सहाव्या स्थानावर आहे. यानंतर ब्रिटन बाजार भांडवल मूल्य सातव्या स्थानावर आहे.