शंभूराजेंनी आतापर्यंत दारूबंदीचा निर्णय का घेतला नाही? सुषमा अंधारे

मुंबई : शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई हे सूड भावनेने राजकारण करत आहेत. येणाऱ्या काळात त्यांना गुलाल मिळू द्यायचा नाही. तुमच्या बालेकिल्ल्यात मी येऊन बोलत आहेत. तुम्ही गुवाहाटीत काय शाखा काढायला गेला होता का? जेपी नड्डा शिवसेनेवर बोलले तेव्हा शंभुराज तुम्ही गप्प का होता? तुमच्या आजोबाने स्वाभिमान अबाधित ठेवला. तुम्हाला आजोबांचे विचार समजले नाही, शंभूराजेंनी आतापर्यंत दारूबंदीचा निर्णय का घेतला नाही, असा सवाल करत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला.

ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई यांच्या पाटण मतदारसंघात सभा पार पडली. यावेळी अंधारेंनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्यावर निशाणा साधला. यावेळी अंधारे म्हणाल्या की, येणाऱ्या काळात कोणत्याही परिस्थितीत काहीही झाले तरी शंभुराज देसाई यांना गुलाल मिळू न देण्याचा कार्यर्त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत पाटण मतदारसंघ शिवसेनेला मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत.