ऊरुस कालावधीत पन्हाळ्याचा पाणीपुरवठा सुरळीत करा करण्याची मागणी

हजरत पीर शहादुद्दीन खत्तालवली म्हणजेच साधोबा दर्गा

पन्हाळा : हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक व पन्हाळ्याचे ग्रामदैवत हजरत पीर शहादुद्दीन खत्ताल शहा वली दर्गा यांच्या ऊरुस दिनांक १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान साजरा होत आहे. तरी या ऊरुस कालावधीत पन्हाळा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, अशी मागणी शिवनसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पन्हाळा उपशहरप्रमुख जुनैद मुजावर यांनी केली आहे.

त्यांनी या मागणीचे निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना सादर केले आहे.पन्हाळगडाला पाणीसमस्या ही काही नवी गोष्ट राहिली नाही. कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पन्हाळ्याचा पाणीप्रश्न नेहमी चर्चेत असतो. पन्हाळावासियांना उत्रे येथील नवीन पाणीयोजनेमुळे 24 तास नियमित पाणीपुरवठा होईल अशी आशा होती.पण नवीन योजनासुरु होवुन देखील एकदिवस आडाने पाणीपुरवठ्याचे गणित काही अद्याप बदले नाही.त्यामुळे पाणीप्रश्नासंदर्भात नागरिकांच्यातुन ओरड सुरु असते. त्यात सण, उत्सव काळात पाणी भरपुर प्रमाणात लागते.

त्यानुसार पन्हाळ्यातील ग्रामदैवत असलेले हजरत पीर शहादुद्दीन खत्ताल वली म्हणजेच साधोबा दर्ग्याचा ऊरुस येत्या १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान साजरा होत आहे.हा ऊरुस हिंदु-मुस्लीम लोकांच्या प्रत्येकांच्या घरात साजरा करण्याची परंपरा आहे.ऊरुसामुळे पन्हाळ्यातील महिला घरातील सर्वसाफ सफाई १० दिवस अगोदर करतात.यासाठी पाण्याची गरज लागते.पण सध्या पाणीपुरवठा कमी प्रमाणात होऊ लागल्याने महिलांना मोठी अडचण होऊ लागली आहे. तसेच १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान ऊरुस कालावधीत भाविकांसह प्रत्येक घरात पै-पाहुणे येत असल्याने पाण्याची गरज वाढते. त्यामुळे ऊरुस कालवधीत सलग तीन दिवस पन्हाळा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा.यासाठी नगरपरिषदेने योग्य नियोजन करावे, अशी मागणी जुनैद मुजावर यांनी केली आहे. तरी या निवेदनाचा गांभीर्याने विचार करण्यात यावा. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नागरिकांच्यावतीने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देखील निवेदनातुन देण्यात आला आहे.