खुपिरेत नववधूंना माहेरचा आहेर भेट..

कोल्हापूर : खुपिरे ग्रामपंचायतीच्या वतीने नवनवीन उपक्रम राबवले जातात. नुकताच घेतलेल्या एका नव्या निर्णयानुसार गावातील मुलगी लग्न करून सासरला जाताना ग्रामपंचायतीकडून माहेरचा आहेर म्हणून साडी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नववधू सायली सरदार नाईक व धनश्री संभाजी निकम या दोघींना दोन हजार रुपये किमतीची साडी भेट देण्यात आली.

नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे एक जानेवारी पासून खुपिरे येथील नववधूला भेट म्हणून साडी देण्याचा निर्णय घेतला होता.

त्याची अंमलबजावणी आता सुरू केली आहे. सरपंच सौ दिपाली जांभळे यांच्या हस्ते नववधूच्या घरी जाऊन ही साडी भेट देण्यात आली. यावेळी उपसरपंच सागर पाटील मा. उपसरपंच व सदस्य युवराज पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्या व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.