वरळीत शिंदे गटाकडून निहार ठाकरे?….

मुंबईः उद्धव ठाकरे यांचे पुत्र, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदार संघात आगामी विधानसभा निवडणूक अत्यंत रंगतदार दिसण्याची शक्यता आहे. शिंदे गटातर्फे या विधानसभा मतदार संघात आदित्य ठाकरे यांचे चुलत बंधू निहार ठाकरे यांना उतरवलं जाणार असल्याची चाचपणी सुरु आहे.

शिंदे गटातील विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभा मतदार संघाची निवडणूक राज्याचं लक्ष वेधून घेणारी ठरण्याची दाट शक्यता आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आदित्य ठाकरे यांनी चॅलेंज दिलं आहे. हिंमत असेल तर मुख्यमंत्रीपद आणि आमदारकीचा राजीनामा द्या. जनतेत उतरून निवडणूक लढवून दाखवा, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय. तुम्ही ठाण्यात लढणार असाल मी ठाण्यात येतो अन्यथा माझ्या वरळी मतदार संघात माझ्याविरुद्ध लढवून दाखवा, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलंय.