ठाकरे चषक व्हाँलीबाँल स्पर्धेत साई क्रिडा मंडळ अजिंक्य…

ठाकरे चषक व्हाँलीबाँल स्पर्धेत अजिंक्य ठरलेल्या साई क्रिडा मंडळाला चषक प्रदान करताना के.डी.सी.सी चे संचालक बाबासाहेब पाटील,अमरसिंह भोसले,नामदेव गिरी आदी मान्यवर

पन्हाळा : बाजीराव नलवडे स्मृति प्रतिष्ठान, नेबापुर यांच्या वतीने आयोजित स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ ‘ठाकरे चषक 2023’व्हाँलीबाँल स्पर्धेत साई क्रिडा मंडळ, नेबापुर संघाने अंतिम सामन्यात बांधारी एक्सप्रेस संघाचा पराभव करत ठाकरे चषकावर आपले नाव कोरले.

तर बांधारी एक्सप्रेस संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील तृतीय क्रमांक शिवाजी क्रीडा मंडळ पन्हाळा यांनी पटकावले.या स्पर्धेतील अंतिम सामन्यात रंगतदार अशी लढत पहावयास मिळाली.पण साई क्रिडा मंडळाने आपल्या उत्क्रुष्ट खेळाच्या जोरावर 25-22,21-25,25-15,25-17 अशा 3-1 सेटनी प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करत अजिंक्यपद पटकावले.बांधारी एक्सप्रेस संघाकडुन अभिजित जाधव,सुनील पाटील यांनी एकाकी झुंझ दिली.याअगोदर पहिल्या उपांत्य सामन्यात बांधारी एक्सप्रेस ने शाहु क्रिडा मंडळ,पन्हाळा तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात साई क्रिडा मंडळाने शिवाजी क्रिडा मंडळ,पन्हाळा या बलाढ्य संघाचा अनपेक्षित रित्या पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.स्पर्घेचे तृतीय क्रमांक शिवाजी क्रीडा मंडळ पन्हाळा यांनी मिळवले.

स्पर्धेतील बेस्ट लिफ्टर म्हणुन शुभम कुंभार,बेस्ट स्मँशर सुनील पाटील,बेस्ट प्लेअर रोहित कांबळे यांचीनिवड करुन त्यांना वैयक्तिक पारितोषिक प्रदान करण्यात आले.

यास्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पन्हाळ्याचे माजी नगरसेवक सतिश भोसले,द्वितीय क्रमांकाचे आंबवडेचे उपसरपंच सरदार पाटील, तृतीय क्रमांक श्री.पोवार(शिंगणापुर) यांच्या वतीने देण्यात आले होते.अंतिम सामन्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरणाचा समारंभ पार पडला.पारितोषिक वितरण समारंभाच्या पुर्वी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे उपजिल्हा प्रमुख नामदेव गिरी,के.डी.सी.सी.बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील(आसुर्लेकर),शिवसेना पन्हाळा तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील जाफळेकर,अमरसिंह भोसले,पिंपळे तर्फ सातवे चे ग्रामपंचायत सदस्य अशोक चव्हाण,संतोष धुमाळ,विजयसिंह नलवडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.स्पर्धेसाठी पंच म्हणुन कपिल खोत,राजु आगा,पिंटु बच्चे यांनी काम पाहिले .तर या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बबन जामदार,अक्षय चाचुर्डे,अनिकेत कदम,आदित्य कदम यांच्यासह बाजीराव नलवडे स्मृति प्रतिष्ठानचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अबिद मोकाशी यांनी केले.