कोल्हापुर विमानतळावर भल्या मोठ्या विमानाचे आगमन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर विमानतळावर आज (मंगळवारी) एमबरर E१९५-E२ प्रॉफिट हंटर हे एक भलं मोठं विमान उतरले. दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी हे विमान कोल्हापूर विमानतळावर लँड झाले. त्यामुळे भविष्यात कोल्हापूर विमानतळाच्या दृष्टिकोनातून हि एक आनंदाची आणि महत्त्वाची घटना आहे.

आजपर्यंत कोल्हापुरात उतरलेल्या विमानांपैकी हे सर्वात मोठे विमान आहे. त्यामुळे कोल्हापूर विमानतळावर अशाच पद्धतीची अनेक विमाने या पुढच्या काळात उतरतील अशी अपेक्षा लागून राहिली आहे.