सहकार चळवळीला दिशा देण्‍याचे काम गोकुळने केले-अनिल कारंजकर

कोल्‍हापूर (प्रतिनिधी): गोकुळने सहकाराच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायात केलेली नेत्रदिपक प्रगती कौतुकास्पद असून गोकुळने महिला,युवकांना दुग्ध व्यावसायाच्या माध्यमातून व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली आहे. सहकार चळवळीला दिशा देण्‍याचे काम गोकुळने केले आहे असे प्रतिपादन पुणे येथील वैकुंठमेहता इन्स्टिट्यूटचे सेवानिवृत्त डिन अनिल कारंजकर यांनी केले. गोकुळ तर्फे ६९ व्‍या अखिल भारतीय सहकार सप्‍ताहनिमित्‍त आयोजित व्याखानामध्‍ये ते बोलत होते.

सहकार सप्ताह निमित्‍त गोकुळ दूध संघातर्फे ताराबाई पार्क कार्यालयात व्याखान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे दिपप्रज्‍वलन व इंदिरा गाधी यांच्‍या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन गोकुळचे चेअरमन विश्वास यांच्या हस्‍ते करण्यात आले. यावेळी सहकार बोर्डाचे एस.पी.जाधव यांनी सहकार गीत सादर केले.

कार्यक्रमाचे स्‍वागत व प्रास्‍ताविका चेअरमन विश्‍वास पाटील यांनी  केली.आभार संचालक शशिकांत पाटील यांनी मानले.सूत्रसंचालन एम.तसेच कार्बन क्रेडीट बायोगॅस योजनेची माहिती सिस्‍टीमा बायोगॅस पुणे या कंपनीचे प्रतिनिधी खुरर्म मुजावर यांनी दिली. पी.पाटील यांनी केले.

याप्रसंगी संघाचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, नंदकुमार ढेंगे,प्रकाश पाटील,चेतन नरके,बयाजी शेळके, सहकार बोर्डाचे एस.पी.जाधव, सिस्‍टीमा बायोगॅसचे खुरर्म मुजावर, अनिकेत शिंदे संकलन व्‍यवस्‍थापक एस.व्‍ही.तुरंबेकर,महिला नेतृत्‍व विकास अधिकारी निता कामत तसेच अधिकारी,कर्मचारी व महिला स्वयंसेविका उपस्थित होत्‍या.