वाघवे येथे बिबट्याचे दर्शन ; परिसरात भीतीचे वातावरण

कोल्हापूर :वाघवे( मानेवाडी )येथील देसाई गुऱ्हाळाजवळ बिबट्याचे दर्शन झाले आहे. यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

अधिक माहिती अशी, वाघवे (ता. पन्हाळा) येथील देसाई गुऱ्हाळघराच्या जवळून जात असताना काहींनी बिबट्याला पाहिला. येथील गुऱ्हाळ घर रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना झाले.कोल्हापूरहून लोक या भागातून रात्री उशिरापर्यंत ये- जा करत असतात. यामुळे सध्या या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाड्यांच्या उत्तरेला दाट जंगल आहे. तर सभोवताली ऊसपीक आहे. या ठिकाणी बिबट्या अनेकदा दिसला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वनखात्याने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाड्यातील ग्रामस्थांची आहे.

🤙 9921334545