कोल्हापूर (प्रतिनिधी) : दि.१४ ते २० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत संपन्न होणाऱ्या ६९ व्या अखिल भारतीय सहकार सप्ताह निमित्ताने गोकुळ तर्फे सहकार ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारात चेअरमन विश्वास पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर सहकार प्रतिज्ञा म्हणण्यात आली. यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी चेअरमन विश्वास पाटील यांनी सर्व सहकारी दूध संस्था, दूध उत्पादक,अधिकारी व कर्मचारी यांना सहकार सप्ताह व बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सहकार सप्ताह निमित्त संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात (शनिवारी) सकाळी ११.०० वाजता डॉ.अनिल करंजकर यांचे सहकार, आत्मनिर्भरता आणि आव्हाने या विषयांवर व्याख्यान आयोजित केले असल्याचे सांगितले. यावेळी सूत्रसंचालन एम.पी. पाटील यांनी केले. आभार जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील यांनी मानले.

यावेळी संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे संचालक अजित नरके, अंबरीशसिंह घाटगे, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. यु.व्ही. मोगले, संकलन व्यवस्थापक एस.व्ही. तुरंबेकर, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
