विद्यामंदिर यादववाडीतील मुलांना मिळणार आता शुद्ध पाणी, ‘या’ जल केंद्राने केली व्यवस्था

श्री ज्योतिर्लिंग शुद्ध पेयजल केंद्र यादववाडी यांच्यामार्फत विद्या मंदिर यादववाडी शाळेस प्रत्येक वर्गास दररोज शुद्ध पाणी पुरवण्याची सुविधा करण्यात आली आहे.

विद्या मंदिर यादववाडी शाळेत ‘स्मार्ट टू ग्लोबल स्कूल’ हा महत्वाकांक्षी प्रकल्प साकारत आहे. यासाठी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ, भागाचे लोकप्रतिनिधी, प्रशासन सर्वजण सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. शाळा समृद्ध करण्यासाठी यादववाडी गावातील व कोल्हापूरसह राज्यभरातून मदतीचे हात सरसावत आहेत. याचाच प्रत्यय आज पुन्हा आला.

आपले प्रयत्न प्रामाणिक असतील तर शाळेच्या गावातील ग्रामस्थ सुद्धा शाळेला सहकार्य करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आज यादववाडी गावातील ग्रामस्थांनी बालदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी आजपासून यापुढे अविरतपणे प्रत्येक तुकडीतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी सोय केली. गावातील ग्रामस्थ मा. महादेव यादव यांनी विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळण्याचे महत्व जाणून आजच्या दिवसापासून शाळेतील 534 विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी देण्यासाठी पुढाकार घेतला. मा. महादेव यादव यांच्या अजोब व वडीलान पासून शाळेला सहकार्य आहे .

शुद्ध पाणी पुरवण्यासाठी लागणारे कॅन, ग्लास, स्टँड, लहान टफ, हे सर्व साहित्य श्री. महादेव यादव, श्री. अनिल कदम, श्री. जोतिराम यादव, श्री. अमोल भोसले, श्री. संतोष सावंत,श्री. इम्रान ताशीलदार, श्री. गणेश वाघमारे, श्री. आकाश नाईक, श्री.रंगराव यादव, श्री. कुलदीप चौगुले, श्री. दिनेश कोकाटे श्री कुमार यादव श्री विठ्ठल यादव श्री तानाजी यादव श्री सूरज रुईकर श्री संजय यादव श्री विठ्ठल कदम श्री सद्दाम मकांदार यांच्या सहकार्यातून उपलब्ध करून दिले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, शाळेतील शिक्षक वृंद, उपस्थित होते.

🤙 8080365706