निपुण कोरे यांची निवड !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वारणा सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि कोल्हापूर नागरी बँक असोसिएशनचे अध्यक्ष निपुण विलासराव कोरे यांची दि. महाराष्ट्र अर्बन को. ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि, मुंबईच्या संचालकपदी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतून बिनविरोध निवड झाली.

कोल्हापूर,सांगली,सातारा या तीन जिल्ह्याचा एक गट आहे. या गटातून निपुण कोरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तब्बल दहा वर्षानंतर कोल्हापूर जिल्ह्याला कोरे यांच्या रूपाने राज्यपातळीवार संधी मिळाली असून यापूर्वी कोल्हापूरचे शामराव शिंदे यांनी प्रतिनिधित्व केले होते.

कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांच्या बँक फेडरेशनच्या माध्यमातून समस्या राज्यपातळीवर मांडण्याची संधी मिळाली आहे. शेतकरी केंद्रबिंदू मानून सहकारी बँकांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे निपून कोरे यांनी संचालक पदी झालेल्या निवडीनंतर सांगितले.

कोरे यांनी वारणा सहकारी बँकेचा आमदार डॉ. विनय कोरे यांच्या सहकार्याने चांगला विकास केला. त्यामुळे आज वारणा बँकेच्या ४० शाखा आहेत. त्या सर्व शाखा सांगणकीकृत आहेत.  १००० कोटी ठेवींचा टप्पा लवकरच पूर्ण करण्याचा मानस बँकेचा आहे. त्यांच्या या योगदानामुळेच कोल्हापूर नागरी बँक असोसिएशनच्या संचालकपदापासून ते अध्यक्षपदापर्यंत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. या काळात जिल्ह्यातील बँकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.