कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या सर्व कायम कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरक व दीपावली तसलमाल अदा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये प्रमाणे दीपावली तसलमात देण्यात आली आहे.

परंतु ठोक मानधन वरील कर्मचाऱ्यांना यापैकी कोणताही लाभ देता आला नव्हता. त्यामुळे ठोक मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांची ऑक्टोबर मधील वेतन आगाऊ देण्याची मागणी होती. त्यानुसार प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आस्थापना विभागाला आदेश देऊन आज (शुक्रवारी) सर्व ठोकमानधनावरील कर्मचाऱ्यांचे हजेरी पत्रक मागून घेऊन तातडीने या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याच्या सूचना आस्थापना अधिक्षक यांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे या कर्मचा-यांच्या पत्रकाची अंमलबजावणी करुन २२४ कर्मचाऱ्यांना ऑक्टोंबरचे वेतन आदा करण्यात आले आहे. या सर्व २२४ कर्मचा-यांना रुपये ३९ लाख ४० हजार इतके वेतन महापालिकेने अदा केले आहे. त्यामुळे या ठोक मानधनवरील कर्मचाऱ्यांची सुद्धा दिवाळी गोड झाली आहे.