नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषक सामन्याच्या पहिल्या सराव सत्रात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या हातातील विजय खेचून आणू शमीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात अवघ्या काहीच धावांची गरज असताना मोहम्मद शमीने अत्यंत महत्त्वाच्या ४ विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना माघारी जाण्यास भाग पाडले. १८० धावांमध्ये पूर्ण ऑस्ट्रेलिया संघ तंबूत परतल्याने भारत ६ धावा राखून विजयी ठरला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या संघाला चार धावा देऊन शमीने षटकाची सुरुवात केली पण त्यानंतर एका पाठोपाठ एक करत चार खेळाडूंना शमीने तंबूत धाडले. सुरुवातीला शमीच्या चेंडूवर पॅट क्युमिन्सने षटकार लागवण्याचा प्रयत्न केला पण विराट कोहली थक्क करणारी कॅच पकडून शमीला साथ दिली.यानंतर अॅश्टन अॅगरला सुद्धा शमीनेच धावबाद केले. यानंतर जॉश इंग्लिस, केन रिचर्डसन यांना शमीने क्लीन बोल्ड करून आपली हॅट्रिक पूर्ण केली.