मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना हे मुख्य नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर पर्यायी नावांचा प्रस्ताव सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने आज (सोमवारी) दुपारी एक वाजेपर्यंतची मुदत ठाकरे आणि शिंदे गटाला दिली होती. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने पक्षासाठी निवडणूक आयोगाकडे तीन नावांचा पर्याय दिला आहे.
निवडणूक आयोगाला शिंदे गटाने सादर केलेल्या नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची असे तीन पर्याय देण्यात आले आहेत.
शिंदे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या तिन्ही नावांमध्ये बाळासाहेब यांचा उल्लेख आहे. यापैकी शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाचा प्रस्ताव ठाकरे गटानेदेखील दिला आहे.त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.