वाकीपाडा येथे कारखान्यात भीषण स्फोट !

मुंबई वृत्तसंस्था : नायगाव पूर्वेच्या वाकीपाडा येथे कॉस पावर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन झालेल्या घटनेत तीन कामगारांचा मृत्यू तर सात जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज बुधवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. तर  पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे.

या झालेल्या स्फोटात कारखान्यात काम करण्यासाठी असलेले बारा कामगार होरपळले. यातील सात जण जखमी झाली आहेत. या स्फोटाची भीषणता इतकी होती की त्याचे हादरे आजूबाजूच्या परिसराला बसले.