हुपरी प्रतिनिधी: रेंदाळ ता.हातकणंगले येथे ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांनी चक्क ग्रामसेवकालाच दारात उभे करुन त्यांची शाळा घेतली. बी.टी.कुंभार असे या ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे.
ग्रामपंचायती मार्फत १४ व १५ व्या वित्त आयोगातुन कोणती विकास कामे झालेली आहेत या संदर्भात ग्रामविकास अधिकारी बी.टी.कुंभार यांच्याकडे लेखी स्वरुपात माहिती मागवली असता दोन तीन महिने होऊन गेले तरी माहिती न मिळाल्याने संतप्त महिला सदस्यांनी ही भूमिका घेतली.सदस्यांना माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहात तर मग सर्वसामान्य नागरिकांना न्याय काय मिळणार असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला.
रेंदाळ येथील ग्रामपंचायत कार्यालयमध्ये काही दिवसांपुर्वी गाव सभा पार पडली. यात नागरिक सहभाग झाले होते. यावेळी नागरिकांनी ग्रामविकास अधिकारी यांना मागील सभेचे, कामकाजाचे व ग्रामपंचायतीने विकासासाठी केलेल्या कामाचा हिशेब व खर्चाबाबत विचारणा केली.मात्र, ग्रामविकास अधिकारी बी.टी.कुभांर यांनी नागरिकांना माहिती देण्यास टाळाटाळ करून त्यांच्या प्रश्नांची उडवाउडव केली. रेंदाळ गावातील समस्या, अडचणी या अजूनही प्रलंबितच आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी विचारणा केली, मात्र ग्रामविकास अधिकारी बी.टी.कुभांर यांनी उत्तर दिले नाही.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हुपरीकडून रेंदाळ कडे येणाऱ्या रस्त्याचे काम बरोबर नाही. सन २०१७ ते २०२२ आज अखेर अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकास कामांचा निधी चुकीच्या पध्दतीने वापरण्यात आला. ग्रामपंचायत प्रशासनाकडून एकूण कर उत्पन्नातून १५% रक्कम चुकीच्या पध्दतीने वापरण्यात आली. १५ या वित्त आयोग अनुसूचित जाति प्रवर्ग सुधारणा राखीव निधी चुकीच्या पध्दतीने वापण्यात आला. अनुसूचित जाती प्रवर्ग समाजाला विश्वासात न घेता बोगस सही करून अनुसूचित जाति प्रवर्ग सुधारणा निधीचा गैर वापर करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयीन देखरेखीतएस टी.स्टॅड येथील गाळे लिलाव न होता परस्पर देण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयीन देखरेखीत गाळे भाड्याने विठ्ठल मंदिर समोर येथील गेली दोन महीने लिलावा होऊन ताब्यात देण्यात आले नाही. यामध्येही घोळ असल्याचे बोलले जात होते. तसेच अशा अनेक समस्यांची माहिती देण्यास बी.टी.कुंभार टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे पुष्पांजली दैव यांनी ग्रामविकास अधिकारी यांना जाब विचारत कार्यालयात प्रवेश करण्यास नकार दिला.
ग्रामपंचायत सदस्यांना जर माहिती मिळत नसेल तर कुंभार यांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येण्यास मज्जाव असल्याचा पवित्रा त्यांनी घेतला.यावेळी हुपरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी मध्यस्थी केली. त्यावेळी बी.टी.कुभांर यांनी सायंकाळी सहापर्यंत माहिती देण्यास मान्य केल्यानंतर कुंभार यांना ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर काही वेळाने आंदोलन मागे घेण्यात आले.
पत्रकारांनी आंदोलना संदर्भात माहिती विचारली असता कुभांर यांनी पळता पाय काढला. रेंदाळ गावातून ३० ते ३५ नागरीकांनी माहीतीच्या अधिकाराद्वारे माहिती मागितली असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे सदर ग्रामविकास अधिकारी बी.टी. कुंभार यांची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.