मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्यावा : आ. प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : राज्य शासनाने ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरू करण्यात आला असून राधानगरी विधानसभा मतदार संघातील जास्तीत-जास्त बेरोजगार युवक-युवतींनी या योजनाचा लाभ घ्यावा यासाठी लागणारी सर्व मदत माझ्या संपर्क कार्यालयातून करण्यात येत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.

ते गारगोटी (ता.भुदरगड) येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना वाटप करतेवेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, राज्यातील सुशिक्षित, अर्धशिक्षित युवक व युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नविन संधी उपलब्ध करून देणासाठी राज्य सरकार मार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम योजना सुरू केली आहे. राज्यातील छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा याचा उद्देश असून यायोजनेमुळे सर्व समावेशक विकास होण्यास मदत होणार आहे. छोट्या उद्योगांतून देखील रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे. यायोजनेच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील युवा पिढीला स्वयंरोजगारासाठी उद्योग उभारायला मदत होणार आहे.

यावेळी माजी सभापती बाबा नांदेकर, बारवे माजी सरपंच योगेश पाटील, संग्राम सावंत, नारायण देसाई, उमेश तेली, के.एम.कुपटे, विदर्भ कोकण बँकेचे मॅनेजर विद्याधर पितांबरे, योजनेचे समन्वयक प्रविण पाटोळे, अवधूत परुळेकर यांच्यासह प्रमुख मान्यवर व लाभार्थी उपस्थित होते.