ई-स्टोअर इंडिया मधील गुंतवणूक सुरक्षित : विनायक राऊत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लाखो लोकांना रेशन, आयुर्वेदिक औषधे देऊन अर्थार्जनाची संधी उपलब्ध करून देणारी देशामधील ई-स्टोअर इंडिया कंपनी पूर्णपणे सुरक्षित, सुस्थितीत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे दोन महिने गुंतवणूकदारांना परतावा मिळाला नाही. त्यामुळेच अफवा पसरविल्या जात आहेत. परंतु हाँगकाँग येथील कंपनीबरोबर ई-स्टोअर इंडिया कंपनीचा करार झाला असून, व्यवसायासाठी कंपनीचा एक्स मार्ट मोबाईल कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे कंपनी पुन्हा जोमाने कार्यरत होईल, असा विश्वास उद्योगपती विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत परिषदेत व्यक्त केला.

यावेळी ते राऊत यांनी ई-स्टोअर इंडिया कंपनीच्या अपप्रचाराबाबत कंपनीची भूमिका मांडली. राऊत म्हणाले, ई- स्टोअर इंडिया कंपनीचे प्रमुख डॉ. फैजान खान यांनी प्रमुखांशी संवाद साधून कंपनीला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी हाँगकाँगमधील कंपनीशी करार केला आहे. १५०० कोटी लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

राऊत म्हणाले, कोरोनाकाळात या कंपनीने गुंतवणूकदारांना योग्य तो परतावा दिला. कंपनीला ऊर्जितावस्था आणण्यासाठीच सप्टेंबरमध्ये सुपरमार्केटचे सर्व साहित्य भरले जाणार आहे. त्यामध्ये मिळणाऱ्या डिस्काऊंटचा लाभ गुंतवणूकदारांनी घ्यावा. सर्व वैदिक आयु केअर शॉपीज, वंडर राइड, इलेक्ट्रिक बाइक शोरूम, ट्रेझर कॅपे, वेअर हाउस सुरक्षित व सुस्थितीत आहेत. गुंतवणूकदारांना देण्यात येणारा परतावा नोव्हेंबरमध्ये देण्यात येणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस अनिल पाटील, सागर सावर्डेकर, दिलीप गौड, के.एस. पोवार, एस. एम. पाटील, गिरीश मिटके, संजय सावंत आदी उपस्थित होते.