खुपिरेमध्ये उर्मी संस्थेतर्फे शालेय साहित्य वाटप

कुडित्रे (प्रतिनिधी) :
खुपिरे (ता.करवीर) येथील गर्ल्स हायस्कूलमध्ये रक्षाबंधननिमित्त गरजू व होतकरू विद्यार्थिनींच्या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ.एस.एन.मगदूम होत्या.

कार्यक्रमास कुंभी कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव पाटील, सरपंच दीपाली जांभळे, उपसरपंच युवराज पाटील, दत्त विकास संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, विठ्ठल पाणीपुरवठा क्रमांक २ चे अध्यक्ष आनंदा पाटील, विठ्ठल पाणीपुरवठा क्रमांक १ चे अध्यक्ष एकनाथ पाटील, श्रीपत विकास संस्थेचे अध्यक्ष हिंदुराव पाटील, जोतिर्लिंग दूध संस्था अध्यक्ष सर्जेराव हुजरे, पोलीस पाटील सौ.सविता गुरव, तंटामुक्त अध्यक्ष दिलीप पाटील उपस्थित होते. सर्व संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, युवक- युवती उपस्थित होते. प्रास्तविक अमित हुजरे यांनी केले. सुमित हुजरे यांनी मनोगत व्यक्त केले. एस.डी पाटील, बबलू पाटील यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन सर्जेराव हराळे यांनी केले. कार्यक्रमास संस्थेचे दिलीप हुजरे, सागर हुजरे, संदीप हुजरे, संदीप भगवान हुजरे, सुरेश हुजरे, अमर राऊत, धनाजी हुजरे, प्राजक्ता हुजरे तसेच शिक्षक व कर्मचारी वर्गाचे विशेष सहकार्य लाभले.

News Marathi Content