मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी १३ ऑगस्ट रोजी कोल्हापूर व सांगली दौऱ्यावर येणार आहेत.

त्यांचे सकाळी ११.३० वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन होणार आहे. तेथून ते मोटारीने सांगलीकडे प्रयाण करतील. खानापूरचे आमदार अनिल बाबर यांच्या गार्डी येथील निवासस्थानी ते दुपारी एक वाजता भेट देणार आहेत.

मुख्यमंत्री शिंदे तेथून् कोल्हापूरला परतणार आहेत. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुपारी तीन वाजता जिल्ह्यातील पूर परिस्थिती व उपाययोजना यासंबंधी आढावा घेणार आहेत. दुपारी चार वाजता ते कोल्हापूर विमानतळ येथे पोहचलतील. दुपारी ४.१५ वाजता मुंबईकडे रवाना होतील.

   
🤙 8080365706