सायबर महाविद्यालयातर्फे वारांगना सखी संघटनेसोबत राखी पौर्णिमा साजरी

कोल्हापूर : सायबर महाविद्यालयातर्फे वारांगना सखी संघटनेसोबत राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. सुरवातीस वारांगना सखी संघटनेच्या शारदाताई यादव यांनी गेली 10 वर्षाहून अधिक काळ सायबर महाविद्यालयातर्फे राखी पोर्णिमा सण साजरा केला जात असून या दिवसाची आम्ही सर्व जण आतुरतेने वाट पाहत असतो. महाविद्यालयाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्याचा पर्यायाने समाजाचा दृष्टीकोन सकारात्मक होत असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक समाजकार्य विभागाचे विभाग प्रमुख डॉ.दीपक भोसले यांनी केले व हा उपक्रम भावनिकतेला बळ देणारा असून या घटकांकडून आयुष्य जगण्यास ऊर्जा मिळत असल्याचे सांगितले.

या प्रसंगी सायबरचे संचालक डॉ. एस. पी.रथ व डॉ. टी वी जी सर्मा यांनी आपली मनोगते व्यक्त केली. पाहुण्यांची ओळख प्रा. पूनम माने यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.सुरेश आपटे यांनी केले.

कार्यक्रमास वारांगना सखी संघटनेच्या सदस्या नीलम ताई ,प्रिया ताई,माही ताई,मीना ताई व राणी ताई यांच्याकडून उपस्थित विद्यार्थ्यांनी राख्या बांधून घेतल्या. कार्यक्रमास समुपदेशक मकरंद चौधरी डॉ. सोनिया राजपूत, डॉ कालिंदी राणभरे, डॉ दुर्गेश वळवी, प्रा.उर्मिला चव्हान, प्रा.सागर ठाकूर, प्रा.महेंद्र जनवाडे, प्रा.शर्वरी काटकर यांचे सहकार्य लाभले.