कोल्हापूर (प्रतिनिधी) : ९ ऑगस्ट या क्रांती दिनाचे औचित्य व आजादी का अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज जिल्हा परिषद मुख्यालय, सर्व पंचायत समित्या तसेच जिल्ह्यातील शाळांमध्ये राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिह चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारीअधिकारी अजयकुमार माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन मनीषा देसाई व उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव ग्रामपंचायत तसेच सर्व खातेप्रमुखासह मुख्यालयातील जवळपास 300 कर्मचारी ही उपस्थित होते.

कला मंचच्या कलाकारांसोबत सर्व कर्मचाऱ्यांनि राष्ट्रगीत व झेंडा गीताचे गायन केले.सर्व पंचायत समिती मध्येही राष्ट्रगीत गायन करण्यातआले. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.