प्रयाग चिखली ग्रामस्थांचे स्थलांतर सुरु

प्रयाग चिखली : पुराचे पाणी वाढतच असल्याने प्रयाग चिखली गावातील ग्रामस्थांनी जनावरांसह स्थलांतरास सुरुवात केली आहे. दिवसभरात सुमारे ५० ते ६० कुटुंबांनी जनावरांसह सोनतळी नवीन वसाहतीमध्ये स्थलांतर केले. सलग दुसऱ्यावेळी ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे लागत आहे.

दरम्यान, चिखलीला संपर्क करता येणाऱ्या चिखली -आंबेवाडी या मुख्य रस्त्यावर अद्याप पुराचे पाणी आलेले नाही. मात्र, येथील आणखी एक मार्ग असलेल्या चिखली ते पन्हाळा रोड (डेअरी पाणंद) दरम्यानच्या रस्त्यावर पाणी वाढले आहे आज काही लोकांनी आज स्थलांतराला सुरुवात केली.

दरम्यान, क्षेत्र प्रयाग येथील दत्त मंदिरासह सर्व मंदिरे पाण्यात गेले आहेत मात्र येथील चिखली वरणगे दरम्यानच्या रस्त्यावर अद्याप पाणी आलेले नाही. पंधरा-वीस दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे चिखलीकरांनी पण स्थलांतर केले होते त्यानंतर पुन्हा एकदा गेल्या चार दिवसातील पूरस्थितीमुळे पुन्हा एकदा चिखलीकरांना स्थलांतरित व्हावे लागत आहे. आज दिवसभरात पावसाचा जोर कमी राहिल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला. पावसाचा जोर कमी असला तरी आज दिवसभरात पाणी वाढतच होते त्यामुळे ग्रामस्थांना पुराची धास्ती वाढली आहे