इंधन समायोजन आकारामध्ये केलेली वाढ मागे घ्यावी : दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशन

इचलकरंजी (प्रतिनिधी) :दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनतर्फे महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना इंधन समायोजन आकारामध्ये केलेली वाढ मागे घेणेबाबतचे निवेदन देणेत आले. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन धुमाळ उपस्थित होते.


यावेळी दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी महावितरण कंपनीने नुकतेच इंधन समायोजन अकारामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. ही वाढ वीज आकाराच्या २०% असून जून २०२२ ते ऑक्टोंबर २०२२ या पाच महिन्यांच्या कालावधीसाठी करणेत येणार आहे. यामुळे यंत्रमागधारक तसेच इतर उद्योजकही अडचणीत आलेले आहेत. आधीच सुताचे वाढते दर, कामगारांची मजूरी, मिलस्टोअरचे वाढते दर, वैफणीच्या दरात वाढ, हमाली, विजेचे वाढते दर, सायझींगचे वाढते दर या अशा वेगवेगळ्या कारणांमुळे गेल्या ४ ते ५ वर्षांपासून यंत्रमाग उद्योग अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. त्यातच या वीज दरवाढीच्या नविन संकटाची भर पडलेली आहे. जरी आपण कायदेशीर प्रक्रिया करून इंधन समायोजन अधिभार लावले असला तरी, सध्याच्या परिस्थितीत उद्योजकांना ते परवडणारे नाही. याचा फेरविचार करणेत यावा आणि वाढ केलेली इंधन समायोजन कराची आकारणी मागे घेणेत यावी असे संगितले.
यावेळी कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांनी आपली मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविणेत येईल असे सांगितले.


यावेळी दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, संचालक, रफिक खानापूरे, चंद्रकांत पाटील, सोमाण्णा वाळकुंजे, चंद्रकांत भोपळे, नारायण दुरूगडे, कारखानदार किरण पोवार, दत्तात्रय टेके, मिलिंद बिडकर यांच्यासह कारखानदार उपस्थित होते.