इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथील पोलीस उपअधीक्षकांच्या पथकासह शहरातील तिन्ही पोलिसांनी बेकायदेशीरपणे देशी-विदेशी मद्य वाहतूक करणार्यांवर आणि हातभट्टी दारु विक्रीच्या ठिकाणी कारवाई करून २२ जणांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ३ दुचाकी, देशी-विदेशी दारुसह सुमारे २ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या पथकासह शहरातील तिन्ही पोलीस ठाण्यांच्या पथकांनी बुधवारी बेकायदेशीरपणे मद्य वाहतुक आणि विक्री करणार्यां विरोधात धडक मोहिम राबवली. गावभाग पोलिसांनी १० ठिकाणी कारवाई करून गावठी हातभट्टी पाऊचमध्ये विक्री करणार्या १० जणांना अटक केली. त्यांच्याकडून साडेसहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला. शिवाजीनगर पोलिसांनी शहरातील विविध सात ठिकाणी आणि कबनूर इथं कारवाई करून ७ जणांना अटक केली. या कारवाईत एक दुचाकी आणि मद्य साठा असा १ लाख १३ हजाराचा मुद्देमाल जप्त केलाय. शहापूर पोलिसांनी गावठी हातभट्टीचा अड्डा उद्धवस्त करून एकाला अटक केली. त्याच्याकडून १३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. उपअधिक्षकांच्या पथकानं स्टेशन रोडवरी इदगाह मैदानजवळ, सांगली रोडवरील बिग बजारजवळ आणि आरगे भवनजवळ कारवाई करून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून २ दुचाकी, देशी-विदेशी मद्यसाठा असा १ लाख १९ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.