कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत घेण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण कमवा व शिका योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या सात विद्यार्थ्यांना आज मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासन संजयसिंग चव्हाण यांच्या हस्ते निवड पत्र देण्यात आले. यावेळी चव्हाण यांनी सदर विद्यार्थ्यांना चांगले काम करून नाव उज्वल करणे बाबत त्यांना मार्गदर्शन केले.
या योजनेअंतर्गत प्रथम वर्षासाठी आठ हजार विद्या वेतन व चार हजार निर्वाह भत्ता दरमहा देण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या वर्षासाठी नऊ हजार व तिसऱ्या वर्षासाठी दहा हजार व निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन श्रीमती मनीषा देसाई उपस्थित होते.