‘कोजिमाशि’वर सत्तारूढ स्वाभिमानी सहकार आघाडीचा झेंडा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आरोप-प्रत्यारोपाने गाजलेल्या कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सत्तारूढ स्वाभिमानी सहकार आघाडीने एकतर्फी विजय मिळवला. सत्तारूढ स्वाभिमानी आघाडीने राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीला २१-० ने पराभूत केले. रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये आज (रविवारी) ३६ टेबलवर मतमोजणी घेण्यात आली. निकाल समजताच विजयी उमेदवारांनी तसेच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला.

(कोशिमाशि) निवडणुकीसाठी काल (शनिवारी) चुरशीने ९५.७ टक्के मतदान झाले. एकूण ८५२६ पैकी ८१०६ मतदारांनी भर पावसात मतदानाचा हक्क बजावला. २१ जागांसाठी ४७ उमेदवार रिंगणात होते.

‘कोजिमाशि’साठी शिक्षक नेते दादा लाड यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ स्वाभिमानी आघाडी व शिक्षक आ. प्रा. जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडी यांच्यात सरळ लढत झाली होती. गेले पंधरा दिवस प्रचाराचा धुरळा उडाला होता. त्यामुळे प्रचंड चुरस निर्माण झाली होती. या निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रदीप मालगावे यांनी काम पहिले.

सत्तारूढ स्वाभिमानी आघाडीचे विजयी उमेदवार :

सर्वसाधारण प्रतिनिधी- कदम श्रीकांत मधुकर, पाटील श्रीकांत गुंडू, कोकाटे प्रकाश रामचंद्र, पाटील उत्तम विलास, खामकर सुभाष हिंदुराव, पाटील दीपक बापूसो, घुगरे दत्तात्रय श्रीधर, पाटील मनोहर संभाजी, चौगले अविनाश महादेव, पाटील राजेंद्र मारुती, डेळेकर लक्ष्मण सखाराम, रानमाळे राजेंद्र पांडुरंग, तावदारे शरद धोंडीराम, शिंदे सचिन धोंडीराम, निकम मदन मारुती, हळदकर पांडुरंग साताप्पा

अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी – चव्हाण अनिल ईश्वरा

भटक्या जाती विमुक्त जमाती / विशेष मागासवर्ग प्रतिनिधी – म्हैशाळ जितेंद्र बिरबल

इतर मागास प्रतिनिधी – शिंदे राजाराम आनंदा

महिला राखीव प्रतिनिधी- पाटील ऋतुजा राजेश, हिरेमठ शितल विवेकानंद

 

🤙 9921334545