कोल्हापूरचे शिवसेनेचे पाच माजी आमदार गोव्यात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, सत्यजीत पाटील व हे सर्वजण गोव्यात एकाच ठिकाणी आहेत.

महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला असून शिवसेनेचे ३५ आमदार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातला गेले आहेत. यात पश्चिम महाराष्ट्रातून गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई, राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर, खानापूर-आटपाडीचे अनिल बाबर, कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचा समावेश आहे. एकीकडे या आमदारांनी गुजरात जवळ केली असतानाच असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पाच आमदारांनी गोवा गाठले आहे. जिल्ह्यातील पक्षाचे पाच माजी आमदारांनी एकाचवेळी एकत्रित गोवा गाठल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे पाचही माजी आमदार एकनाथ शिंदे समर्थक असल्याने उलटसुलट चर्चेला वेग आला आहे.