पुणे : करुणा शर्मा यांच्याविरोधात एट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करुणा शर्मा यांच्याविरोधात पुण्यातील येरवडा येथील एका महिलेने तक्रार दिली आहे.
या महिलेने तक्रारीत करुणा शर्माने शस्त्रे दाखवून शिवीगाळ, अपहरण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार महिला आणि तिचा पती उस्मानाबाद येथे राहत होते. नोव्हेंबर २०११ मध्ये ती पतीसह करुणा शर्माला भेटली. फिर्यादीचा पती वारंवार करुणा शर्माच्या घरी राहायचा. त्यानंतर फिर्यादी व तिचा पती पुण्यात स्थायिक झाले. पती करुणा शर्मा यांच्याशी वारंवार बोलत होता. एका कार्यक्रमाला भोसरी येथे बोलावून या कार्यक्रमात करुणा शर्मा यांनी जातीवाचक शब्द वापरून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद त्या महिलेने दिली आहे.