कोरोनामुळे विधवा झालेल्या महिला शेतकऱ्यांना मोफत बियाणांचे वाटप

कोल्हापूर : कोरोनामुळे विधवा झालेल्या करवीर तालुक्यातील महिला शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व करवीर तालुका बियाणे किटक नाशक विक्रते संघाच्यावतीने मोफत बियाणांचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी भिमा शंकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना भिमाशंकर पाटील म्हणाले, कोरोनामुळे पतीच्या निधनानंतर विधवा झालेल्या महिलावर संकट कोसळले आहे. या संकटसमयी प्रशासनाने व या विक्रेत्यांनी मोफत बियाणे देउन साथ दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात उस पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जिल्ह्यात उस उत्पादन वाढ अभियान राबविण्यात येत आहे.

यावेळी न्यूज मराठी 24 चे मुख्य संपादक दत्तात्रय बोरगे, करवीरचे शेती अधिकारी एस. एस. रूपनार, सहाय्यक संतोष मोरे, खुपीरेचे उपसरपंच युवराज पाटील,  साबळेवाडी सरपंच जोती आंबी, उपरपंच नामदेव पाटील, दूध संस्थेचे चेअरमन आनंदा पाटील, सामाजिक कार्यकर्ते बबलू पाटील, बियाणे विक्री संघटनेचे सागर खाडे, अरिहंत शेती सेवा केंद्राचे लक्ष्मण जाधव आदी उपस्थित होते.