म्हैसाळमध्ये विष पिऊन एकाच कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या

मिरज : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील अंबिका नगरमध्ये एकाच कुटुंबातील ९ जणांनी विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नऊ जणांचा मृत्यू झाल्याने सांगली हादरली असून या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तपासाला सुरूवात केली आहे.

म्हैसाळ येथील माणिक यल्लाप्पा व्हनमोरे आणि पोपट यल्लपा होनमोरे या दोन भावाच्या कुटुंबातील ९ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती आहे. आत्महत्या केलेल्या ९ जणांमध्ये एका पशुवैद्यकीय डॉक्टरचा समावेश आहे. घटनास्थळी पोलिस व ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.

डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा) आणि पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या तपासानंतर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या केली गेली असावी, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

🤙 9921334545