२८५ आमदारांचं मतदान पूर्ण; ‘यांच्या’ मतावर आक्षेप; आता निकालाची प्रतीक्षा

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी २८५ आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मात्र, काँग्रेसनं भाजपचे पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजपच्या कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे.

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान पार पडलं. या १० जागांसाठी ११ जण रिंगणात आहेत. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव निश्चित आहे. मात्र, हा उमेदवार महाविकास आघाडीचा असेल की भाजपचा, हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. २८५ आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. आता निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसनं भाजपचे पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजपच्या कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे.

हरिभाऊ बागडे यांनी आज पहिला मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलिंग एजंट म्हणून प्राजक्त तनपुरे, अनिल पाटिल आणि संजय बनसोडे कार्यरत होते. भाजपकडून संजय कुटे, अतुल भातखळकर, रणधीर सावरकर, आशीष शेलार, राहुल नार्वेकर तर कॉंग्रेसचे पोलिंग एजंट अमर राजूरकर, सुनील केदार, यशोमती ठाकूर, अस्लम शेख पोलिंग एजंट म्हणून यांनी काम पाहिले.