मुंबई : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करण्यास परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता. आता नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दुपारनंतर यां त्यांच्या अर्जावर आज दुपारी सुनावणी होणार आहे.

अनिल देशमुख सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपामुळं सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. तर, नवाब मलिक हे देखील ईडी कोठडीत आहेत. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात एका खंडपीठापुढं तातडीनं सुनावणी करण्यासाठी सादर करण्यात आली. मात्र, खंडपीठानं या याचिकेवर सरन्यायाधीशांच्यापुढं सुनावणी व्हावी, असं मत मांडलं आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या अर्जावर आज दुपारनंतर सुनावणी होऊ शकते.