‘…तर मी राष्ट्रपती होऊ शकतो’; अभिजित बिचुकलेंचं ‘असं’ आहे गणित !

मुंबई : बिग बॅास फेम अभिजित बिचुकले राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी १०० आमदारांच्या सह्या आवश्यक असतात. यासाठी बिचुकले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना साकडं घातलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं शिवसेनेशी आघाडी करून जसं महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. त्याप्रमाणे जर शक्य असेल तर महाराष्ट्रातील एक लढवय्या या नात्याने पवार साहेबांनी मला पाठिंबा द्यायचं ठरवलं तर माझं काम एकदम सोपं होईल, अशी त्यांना आशा आहे. मागील राष्ट्रपती निवडणुकीवेळी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. मी निर्व्यवसनी, सुशिक्षित आणि कायद्याची माहिती असणारा व्यक्ती आहे, असं त्यांना सांगितल होतं. पण त्यावेळी त्यांनी रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली होती. त्यांना बहुमतामुळे ते जमलं, असं ते म्हणालेत. सांगली, कोल्हापूर आणि पुणे येथील आमदार-खासदारांशी माझं बोलणं सुरु आहे. १०० नेत्याच्या सह्या मिळाल्यास नक्की अर्ज भरणार आहेत. पण जोपर्यंत अर्ज भरत नाही तोपर्यत गुपित ठेवणार असल्याचं बिचकुले यांनी सांगितलं.