महालक्ष्मी सतारुढ पॅनेलच्या सीपीआरमधील प्रचार सभेला प्रतिसाद

कोल्हापूर : धन्वंतरी सेवक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी सत्तारूढ महालक्ष्मी पॅनेलच्या सीपीआर येथील प्रचार मोहिमेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी मॅग्मो संघटनेचे अध्यक्ष डॉ. असिफ सौदागर यांनी विमान चिन्ह असलेल्या सत्तारुढ महालक्ष्मी पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन केले. प्रचारादरम्यान महालक्ष्मी सतारूढ पँनेलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार सभासदांनी व्यक्त केला आहे.

यावेळी डॉ. फारूक देसाई, मोहन जांभळे, हशमत हवेली, सुहास माने, रंगराव वायदंडे, मंगल चव्हाण यांच्यासह सर्व उमेदवार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.