कोल्हापुरातलं ‘जयहिंद’ आता अवतरणार नव्या रूपात !

कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या शाही पसंतीची दाद मिळवणारं जयहिंद कलेक्शन ! ब्रँडेड जेण्ट्स शॉपिंगसाठी कोल्हापुरात गेल्या १० वर्षांपासून नावाजलेल्या जयहिंद नव्या रुपात आता पाहायला मिळणार आहे. पूर्वी फक्त पुरूषांच्या वस्त्रखरेदीसाठी पंचक्रोशीत सुप्रसिध्द असणारं हे नाव आता फॅमिली शॉपिंगसाठी देखील वाखाणलं जाणार आहे. कारण आपल्या सर्वांचं लाडकं ‘जयहिंद’ आता आपल्या समोर येत आहे, नव्या रूपात आणि नव्या दिमाखात !

दि. २७ मे रोजी दु. १२.३० वा राजारामपुरी चौकात असणाऱ्या जयहिंदचे या १५००० स्क्वे. फुटांच्या आकर्षक शोरूमचा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या नव्या रूपातल्या प्रशस्त शोरूममध्ये शॉपिंगसाठी तब्बल ५ मजले सुसज्ज ठेवण्यात आले आहेत. या नव्या दालनाचं प्रमुख आकर्षण म्हणजे जयहिंदमध्ये आता जेण्ट्स वेअर सोबतच वूमन्स वेअर व चिल्ड्रन्स वेअरही उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे जयहिंदचे हे नवं रूप आता संपूर्ण फॅमिलीला आकर्षित करणारं ठरेल यात शंकाच नाही.

पुरूषांसाठी फॉर्मल्स, कॅज्युअल्स, फॅब्रिक्स, बीस्पोक टेलरिंग व ॲक्सेसरीज्‌च्या नावीन्यपूर्ण व्हरायटी असणार आहेतच. पण त्यासोबतच कोल्हापुरातल्या महिलांना आवडतील अशा वैविध्यपूर्ण वस्त्रांची श्रेणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या पारंपारिक साड्यांपासून ते भारतीय शैलीतील विविध वस्त्रप्रकार असणार आहेत. रोजच्या वापरापासून ते सणसमारंभासाठीच्या पेहरावापर्यंत मोठी श्रेणी तुम्हांला इथे पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर वेस्टर्न प्रकारांमध्येही फॅशन व ट्रेंड तुमच्यासाठी इथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यासोबतच मुलांसाठी कॅज्युअल्स, वेस्टर्न व एथनिक प्रकारातील मोठी रेंज इथे असणार आहे. कोल्हापुरातील शाही समारंभासाठी जयहिंदचा ‘मेवार’ हा एथनिक वेअर ब्रँडही तुमच्यासाठी नव्या दिमाखात सज्ज झालेला आहे. मेन्स व वूमेन्स एथनिक वेअरसाठी इथे दोन स्वतंत्र स्टुडिओज्‌ देखील असणार आहेत.

त्यामुळे आता कोल्हापुरातल्या संपूर्ण कुटुंबाची वस्त्रखरेदी ही आपल्या जयहिंदमध्ये करता येणार आहे. शुभारंभानिमित्त दि. २७ ते २९ मे या काळात खास ऑफर देण्यात आलेली असून यामध्ये रू. ५००० व पुढील खरेदीवर २५ टक्के किंमतीचे फ्री शॉपिंग व्हाऊचर्सही देण्यात येणार आहे.

पुरूषांचे जयहिंद ते फॅमिली शॉपिंग या बदलाबद्दल सांगताना जयहिंदचे संचालक दिनेश जैन यांनी सांगितले की, काळाप्रमाणे, वस्त्रखरेदीचाही ट्रेंड बदलताना दिसत आहे. ग्राहक संपूर्ण कुटुंबासोबत शॉपिंगला अधिक प्राधान्य देतात व त्यामध्येही एकाच ठिकाणी ही सगळी खरेदी व्हावी अशी ग्राहकांची मानसिकता आहे, असे आमच्या संशोधनातून पुढे आले. त्यामुळेच कोल्हापुरातल्या पुरूष ग्राहकांना शॉपिंगचा आनंद देत असतानाच त्यांच्या कुटुंबासाठीही आपण आपले दालन सज्ज करून द्यावे आणि कोल्हापुरातल्या कुटुंबांचे शॉपिंग जयहिंदमध्ये व्हावे याच विचारातून हे जयहिंदचे नवे रूप आम्ही कोल्हापुरकरांसमोर आणले आहे. मॉडर्न, फॅशनेबल व ट्रेडिशनल कपड्यांसाठी जयहिंद कोल्हापुरमध्ये सुप्रसिध्द आहेच. आता आगामी काळात फॅमिलीचं शॉपिंग डेस्टिनेशन म्हणून आमची नवी प्रतिमा लवकरच कोल्हापुरमध्ये उदयास येईल याची आम्हांला खात्री आहे. हे नवीन शोरूम जितकं प्रशस्त आहे तितकाच इथला शॉपिंगचा अनुभव आणि जयहिंदची सेवा सुखद असणार आहे. यासाठीच कोल्हापुरकरांनी या शोरूमच्या शुभारंभास दि. २७ मे रोजी यावे आणि या शोरूमचा अनुभव तसेच शुभारंभ ऑफरचाही लाभ घ्यावा, असे आवाहन जयहिंदचे संचालक दिनेश जैन यांच्यातर्फे करण्यात आले आहे.