उंचगाव : तरुण मुलांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी, यासाठी करवीर शिवसेनेच्यावतीने उंचगाव येथे शिवजयंतीनिमित्त घेतलेल्या जोर- बैठका, सपट्या व मुदगल फिरवणे स्पर्धांना उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे उद्घाटन १९८५ चे महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर यांच्या हस्ते झाले.
बक्षीस वितरण शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, माजी नगरसेवक अशोक रेडेकर, कामगार सेनेचे राजू सांगावकर, तालुकाप्रमुख विनोद खोत, उपतालुकाप्रमुख पोपट दांगट, दीपक पाटील, उपशहर प्रमुख शशि बिडकर, फेरीवाला संघटनेचे वसंतराव मोरे, उप तालुकाप्रमुख विक्रम चौगुले, उंचगावचे माजी सरपंच गणेश काळे, गावप्रमुख दीपक रेडेकर, विनायक जाधव, विजय गुळवे, विराग करी, महेश खांडेकर, शिवप्रतिष्ठानचे शरद माळी, हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, युवा सेनेचे संतोष चौगुले, वस्ताद जयवंत पाटील, सचिन राठोड, अनिल कदम, दत्ता ठाणेकर, नामदेव वाईंगडे, संग्राम यादव, प्रफुल्ल घोरपडे, बाळू नलवडे, सुरज इंगवले, अजित चव्हाण, दत्ता फारकटे, संदीप वाईंगडे यांच्या उपस्थितीत झाले.
या स्पर्धेवेळी २०२२ सालचा महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील यांच्या आई वडिलांचा व पै. बाबासाहेब पाटील, शुभांगी पाटील यांचा सत्कार जिल्हाप्रमुख संजय पवार व करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्याहस्ते करण्यात आला. या स्पर्धेत अवघ्या सहा वर्षाची बजरंग आखाड्याची पै. वेदिका चव्हाण हिने पाच मिनिटांत १५५ सपट्या मारत सर्वांचे लक्ष वेधुन घेत वाहवा मिळवली. या कार्यक्रमाचे नियोजन करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी केले.
या स्पर्धांमधील विजेते खालीलप्रमाणे-
लहान गट जोर मारणे : प्रथम – विरेंद्र वळकुंजे व साई सपाटे, द्वितीय – समर्थ भोपळे, तृतीय – गणेश मोरे व गुरू निकम.
लहान गट सपट्या मारणे : प्रथम – गणेश भंडारी,द्वितीय – क्रिश सपाटे, तृतीय – रितेश यादव.
मोठा गट बैठका : प्रथम – विराज कुंभार, द्वितीय – वैभव एडके, तृतीय – रोहित ढोबळे.
मोठा गट जोर मारणे : प्रथम – श्रीकृष्ण पोवार, द्वितीय – ओंकार करपे, तृतीय – विजय पुजारी
मोठा गट सपाट्या : प्रथम – संदीप माने, द्वितीय – वैभव शिवे, तृतीय – संदेश आवटे.
प्रौढ गट मुदगल फिरवणे : प्रथम – वस्ताद जयवंत पाटील, द्वितीय – बाबुराव पाटील, तृतीय – नामदेव कुंभार.