नवी दिल्ली : लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा, यासाठी केलेली न्यायिक मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने योग्य तो निर्णय घेऊन, त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी आज लोकसभेत केली.
लोकसभेत शून्य काळात सूचना मांडताना खासदार धैर्यशील माने म्हणाले, ‘लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर हे एक महान, द्रष्टे समाजसुधारक संत होते. त्यांना विश्वगुरू म्हटले जाते. १२ व्या शतकात जेव्हा अंधश्रद्धा, स्पृश्य-अस्पृश्य, व जातीयवाद होता. त्यावेळी महात्मा बसवेश्वर यांनी दिनदलितांना एकत्र करून जातीभेद मिटवत, त्यांनी अनुभव मंडप या नावाने लोकसंसदेची स्थापना केली. या अल्पसंख्याक असलेल्या लिंगायत बांधबांची मागणी आहे कि, त्यांना अल्पसंख्याक म्हणून गणल जाव. ब्रिटीश काळात १९४१ पर्यंत हा समाज अल्पसंख्याक म्हणून होता. स्वातंत्र्यानंतर ती मान्यता काढून घेण्यात आली आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारकडे लिंगायत समाजाची ही मागणी न्यायोचित असून संविधानाला धरूनच आहे. हा समाज गेल्या अनेक अल्पसंख्याक दर्जा मिळण्याची मागणी करत आहेत. त्यांना मान्यता देऊन योग्य तो सन्मान करावा,’ असे हि ते म्हणाले.